शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:19 IST2021-08-24T04:19:49+5:302021-08-24T04:19:49+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि २१) संध्याकाळी पाथर्डी फाटा परिसरातील स्वराज्यनगर येथे शिवसेना महिला आघाडीच्या ...

Crime against Shiv Sena Women's Front office bearers | शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि २१) संध्याकाळी पाथर्डी फाटा परिसरातील स्वराज्यनगर येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शाखा उद्घाटन करण्यात आले. कोरोना नियमाचे उल्लंघन करून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ४० ते ५० महिला शिवसैनिकांनी गर्दी केली होती. कोरोनाचा संसर्गाचा धोका कायम असताना राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयोजक महिला शिवसैनिक संशयित करुणा धामणे, ऐश्वर्या भदाने सुशीला राजपूत, ललिता गोसावी, गायत्री सूर्यवंशी, रोहिणी जाधव, उज्ज्वला जोशी, दीपाली पाटील यांच्यासह महिला शिवसैनिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against Shiv Sena Women's Front office bearers