शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

शिवपिंडीला रंग दिल्याने अध्यक्षांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 1:38 AM

नाशिक : सोमेश्वर मंदिराच्या शिवपिंडीवरून पेटलेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला असून, ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांच्याविरुद्ध भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे याच परिसरात सुशोभिकरण करणाऱ्या मूर्तिकार तांबट यांना रोखण्यात आल्याने आता वाद वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसोमेश्वरचा वाद : सुशोभिकरणाचे काम रोखले

नाशिक : सोमेश्वर मंदिराच्या शिवपिंडीवरून पेटलेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला असून, ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांच्याविरुद्ध भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे याच परिसरात सुशोभिकरण करणाऱ्या मूर्तिकार तांबट यांना रोखण्यात आल्याने आता वाद वाढण्याची शक्यता आहे.शहरातील गंगापूररोडवरील ट्रस्टवर नव्याने विश्वस्तांची नियुक्ती झाली असून, त्यातच माजी विश्वस्त आणि काही विद्यमान सदस्य यांच्यातील बेबनाव यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. सदर ट्रस्टच्या माध्यमातून सुधारणा करण्याच्या नावाखाली अध्यक्ष गोरे यांनी परस्पर कामे सुरू केली असून, त्यातच त्यांनी शिवपिंडीला चक्क आॅइलपेंट केल्याने गुरुवारी (दि. ३) वाद सुरू झाला. यासंदर्भात अरुण धोंडू पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद बाळकृष्ण गोरे (रा. शिखरेवाडी) यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २ जुलै रोजी सायंकाळी आपण नेहमीप्रमाणे मंदिरात गेलो असता त्याठिकाणी महादेवाची पिंड काळ्या पाषाणाची दिसली नाही. त्यावर रंगकामाच्या वेळी मारली जाणारी पलटी तसेच पिवळसर पांढरा रंग दिसला. त्यासंदर्भात व्यवस्थापक दिनेश भामरे आणि पुजारी पंडित यांना विचारणा केली असता त्यांनी अध्यक्ष कारागिरांना सांगून रंगकाम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रमोद गोरे यांना विचारणा केली असता त्यांनी ट्रस्टचे सरचिटणीस बाबूसाहेब गायकर व खजिनदार गोकूळ पाटील यांना विचारणा करून काम करीत असल्याचे सांगितले. यासंदर्भात माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्यासह अन्य सहकाºयांना बोलविले असता त्यांनीदेखील प्रत्यक्ष पाहणी केली असता धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर रंगकाम केल्याचे आढळले. गोरे यांनी परस्पर अशाप्रकारे रंगकाम करून भावना दुखावल्याचा कलम २९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, श्रावणाच्या पार्श्वभूमीवर सुशोभिकरणाचे काम करणाºया शिल्पकार प्रसन्ना तांबट करीत असताना शुक्रवारी (दि.३) सकाळी माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील आणि अरुण पाटील यांनी त्यांना रोखल्याची तक्रार तांबट यांनी केली आहे. या प्रकारामुळे ट्रस्टच्या कामावरून तेढ वाढली असून, हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळे