मारहाण करणाऱ्या जमावाविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: February 17, 2017 00:41 IST2017-02-17T00:41:30+5:302017-02-17T00:41:41+5:30
मारहाण करणाऱ्या जमावाविरुद्ध गुन्हा

मारहाण करणाऱ्या जमावाविरुद्ध गुन्हा
मालेगाव : येथील मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या बंद काळात तरूणांना मारहाण करुन जखमी करणाऱ्या चार जणांसह सुमारे १५ ते २० अनोळखी इसमांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस नाईक नवनाथ कदम यांनी फिर्याद दिली. जयेश श्रावण मोरे (२१) रा. पाटीलनगर कलेक्टरपट्टा, दिपक सोमनाथ आमले (२०) रा. मॉर्निंग स्टार चौक संगमेश्वर, आकाश महेश शाह (२५) रा. निसर्गनगर आणि समाधान मच्छिंद्र सोनवणे (२५) रा. कलेक्टरपट्टा यांच्यासह सुमारे १५ ते २० अनोळखी इसम यांनी अब्दूल रहेमान एकलाख अहमद (१९) रा. मोतीतालाब त्याच्या सोबत असलेला मोहंमद आफताब मोहंमद ताहीर रा. गोल्डननगर, अन्सारी अकदस शौकतअली यांना तसेच नानावटी पेट्रोल पंपाजवळ जहीर अहमद जावेद अहमद (२३) रा. इस्लामपुरा, एजाज अहमद महेमुदुल्लाह हसन (२४) रा. नांदेडीशाळा गयासनगर अशा पाच जणांना मारहाण व शिवीगाळ केली.
आज चित्रपटगृहे बंद
शहरात तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहरातील सर्वचित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी अजय मोरे यांनी दिले आहेत. शुक्रवारी यंत्रमाग बंद असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे प्रांत मोरे यांनी सांगितले.