शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनग्न आंदोलनप्रकरणी जितेंद्र भावे, अमोल जाधव यांच्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 18:04 IST

रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेली डिपॉझिटची रक्कम परत मिळावी यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन करणारे ‘आप’चे पदाधिकारी जितेंद्र भावे तसेच रुग्णाचे नातेवाईक अमोल भाऊसेठ जाधव यांच्याविरुद्ध अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे वोक्हार्ट हॉस्पिटलची जितेंद्र भावे यांच्या विरोधात तक्रार  वैद्यकीय संस्था हिंसा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई

नाशिक : डिपॉझिटची रक्कम परत मिळावी यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन करणारे ‘आप’चे पदाधिकारी जितेंद्र भावे तसेच रुग्णाचे नातेवाईक अमोल भाऊसेठ जाधव यांच्याविरुद्ध अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अमोल जाधव यांच्या कुटुंबातील सदस्य कोविडबाधित झाल्यानंतर त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर डिपॉझिटचे दीड लाख रुपये रुग्णाच्या कुटुंबीयांना परत मिळावे यासाठी जितेंद्र भावे व अमोल जाधव यांनी वोक्हार्ट रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केले होते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर जितेंद्र भावेसह अमोल जाधव यांना पोलिसांनी चौकशीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणल्यानंतर जितेंद्र भावे यांच्या समर्थकांसह शहरातील नागरिकांनी जमावबंदी झुगारून मुंबई नाका पोलीस ठाण्याला घेराव घालत सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉस्पिटल आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करीत आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनप्रकरणीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे हॉस्पिटलबाबत तक्रार असल्यास लेखी स्वरूपात फिर्याद देण्याचे आवाहन पोलिसांनी रुग्णांच्या नातेवाइकांना केले होते. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनातर्फे गंगाप्रसाद यादव (रा. माघ सेक्टर, भुजबळ फार्म रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी (दि. ३) पोलिसांनी जितेंद्र भावे व अमोल यादव यांच्या विरोधात संगनमताने हॉस्पिटलमध्ये आरडाओरड करीत स्वत:च्या अंगावरील कपडे काढून महिला कर्मचाऱ्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याचा व वैद्यकीय संस्था हिंसा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये २५ मे रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जितेंद्र भावे यांनी रुग्णांच्या नातेवाइकांसह स्वत:च्याही अंगावरील कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले होते. या प्रकरणात मुंबई नाका पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शहरात रुग्णालय व पोलीस प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत जितेंद्र भावे यांना सोडून द्यावे लागले होते. मात्र, पोलिसांनी आता पुन्हा रुग्णालयाकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे जितेंद्र भावे व अमोल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल