तलवारीने केक कापणाऱ्याविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: November 3, 2015 21:25 IST2015-11-03T21:25:07+5:302015-11-03T21:25:52+5:30
तलवारीने केक कापणाऱ्याविरुद्ध गुन्हा

तलवारीने केक कापणाऱ्याविरुद्ध गुन्हा
इंदिरानगर : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार इंदिरानगर परिसरातील वडाळागावात घडला आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित इम्रान आसिफ शेख
(२३, अलिशान सोसायटी, वडाळागाव) याच्यावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी लक्षात घेता गेल्या पाच दिवसांपासून पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधत आहेत़ या उपक्रमाद्वारे नागरिक ांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल व गुन्हेगारी घटनांची माहिती पोलिसांना मिळेल अशी आशा आहे़ पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगारांचे वास्तव्य असणाऱ्या वडाळागावात दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी संवाद साधला होता़ वडाळागावातील अतिउत्साही युवकांनी रविवारी आपल्या मित्राच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापला़ हा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी यातील सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे़ या युवकांनी हत्यार कोठून आणले, हत्यार बाळगण्याचा उद्देश काय याबाबतची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. (वार्ताहर)