साडेतीन लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: October 31, 2015 22:20 IST2015-10-31T22:20:10+5:302015-10-31T22:20:59+5:30
साडेतीन लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा

साडेतीन लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा
मालेगाव : येथील सूत व्यापाऱ्याची तीन लाख ५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहमद अनिस मो. सिद्धिक (५०) रा. रौनकाबाद, मोमीनपुरा या सूत व्यापाऱ्याने किल्ला पोलिसात ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित अब्दुल खालीद नुरी, रा. कमालपुरा यांना तीन लाख ५० हजार रुपये किमतीचे सतराशे पन्नास किलो वजनाचे सूताचे पॉलिस्टर यार्न कापड बनविण्यासाठी दिले होते. संशयित नुरी यांनी या मालापासून कापड तयार केले. हे तयार केलेले कापड फिर्यादीला न देता संशयिताने हमदम टेक्स या नावाचा शिक्का मारून परस्पर दुसऱ्या व्यापाऱ्यास विकले. याविषयी फिर्यादीने कापड मागितले असता संशयिताने मिळणार नाही असे सांगत पुन्हा कापड मागितल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. पोलिसांनी मोहमद अनिस यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक डी. पी. पाटील तपास करीत आहेत.