सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: April 26, 2017 16:41 IST2017-04-26T16:41:47+5:302017-04-26T16:41:47+5:30
सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा
नाशिक : सोशल मीडियावरील फेसबुकवर एका समाजाची बदनामी करणारा मजकूर टाकल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी पंचवटीतील एका वृद्धास अटक केली आहे़
सिडकोतील भुजबळ फार्मजवळील अशोकवन कॉलनीतील रहिवाशाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मनोरभाई कुबेरभाई पटेल (६५, हिरावाडी, पंचवटी) याने एका समाजाची बदनामी करणारा मजकूर मंगळवारी (दि़२५) दुपारच्या सुमारास फेसबुकवर पोस्ट केला़ यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
याप्रकरणी अंबड पोलिसांनी पटेल याच्याविरोधात आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)