दुधात भेसळ केल्याप्रकरणी संकलन केंद्र चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:17+5:302021-09-19T04:16:17+5:30

पाथरे - पोहेगाव रस्त्यावर अक्षय ज्ञानेश्वर गुंजाळ यांचे दूध संकलन केंद्र आहे. या केंद्रात गायीच्या दुधात व्हे पावडर, ...

Crime against collection center operator for adulteration of milk | दुधात भेसळ केल्याप्रकरणी संकलन केंद्र चालकावर गुन्हा

दुधात भेसळ केल्याप्रकरणी संकलन केंद्र चालकावर गुन्हा

पाथरे - पोहेगाव रस्त्यावर अक्षय ज्ञानेश्वर गुंजाळ यांचे दूध संकलन केंद्र आहे. या केंद्रात गायीच्या दुधात व्हे पावडर, रिफाईंड सोयाबिन तेल यांची भेसळ करुन विनापरवाना विक्री करुन पॅराफीनसदृश्य अज्ञात रंगहीन द्रव हे मानवी सेवनाला व आरोग्याला अपायकारक असल्याची माहिती असूनही जवळके येथील न्यू ज्ञानेश्वर दूध संकलन केंद्राने दूध खरेदी केली. गुंजाळ यांना शेख (पूर्ण नाव माहिती नाही) व हेमंत पवार (उजनी, ता. सिन्नर) यांनी व्हे पावडर व पॅराफीनसदृश्य अज्ञात रंगहीन द्रव असे भेसळ करण्यास लागणारे साहित्य विक्री करुन मानवी जीवितास घातक होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून संशयित अक्षय गुंजाळ (रा. पाथरे, न्यू ज्ञानेश्वर दूध संकलन केंद्र, जवळके), शेख (पूर्ण नाव नाही) व हेमंत पवार या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी, हवालदार प्रवीण अढांगळे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Crime against collection center operator for adulteration of milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.