शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा लहाडेसह दोघांवर एमटीपीनुसार गुन्हा

By admin | Updated: April 17, 2017 00:59 IST

गर्भपात प्रकरण : महिलेसह नातेवाईक आरोपी

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा शिवाजी लहाडे, डॉ़ कमलाकर उलाजी जाधव व गर्भवती महिला सीमा शरद शेजवळ या तिघांवरही गर्भपात कायद्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन व विनापरवाना अवैध गर्भपात (द मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेगनन्सी अ‍ॅक्ट १९७१ - एमटीपी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ डॉ, कमलाकर जाधव यांनी डॉ़ वर्षा लहाडे यांच्या सांगण्यावरून महिलेचा गर्भपात केल्याचे तसेच कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा जबाब दिला असून, संबंधित महिलेस रक्तस्त्राव होत नसल्याचेही म्हटले आहे़ दरम्यान, एमटीपी कायद्यान्वये प्रथमच गर्भवती महिलेवर गुन्हा दाखल झाल्याची वैद्यकीय वर्तुळात चर्चा आहे़ डॉ़ विजय डेकाटे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रयाग हॉस्पिटलमधील एका महिलेकडून २० हजार रुपये घेऊन जिल्हा रुग्णालयात तिचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आली ़ त्यानुसार जिल्हा रुग्णालयात चौकशी केल्यानंतर निफाड तालुक्यातील पिंपळगाव (ब) येथील सीमा शरद शेजवळ या महिलेचा गोळ्या देऊन गर्भपात केल्याचे आढळून आले़ या महिलेस डॉ़ लहाडे यांच्या खासगी प्रयाग हॉस्पिटलमधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ विशेष म्हणजे शेजवळ यांना गर्भपातानंतर डॉ़लहाडे यांच्या सूचनेनुसार त्वरित घरीही सोडण्यात आले़जिल्हा रुग्णालयात गर्भपातातील स्त्री जातीच्या गर्भ ताब्यात घेण्यास शेजवळ व तिच्या कुटुंबीयांना नकार दिला होता़ मात्र डॉक़मलाकर यांनी नातेवाइकांना फोन करून रात्री दहा वाजता हे अर्भक ताब्यात दिले़ मुळात डॉक़मलाकर यांनी पोलीस ठाण्यात दवाखाना नोंद (एमएलसी) तसेच अर्भकाचे शवविच्छेदन करणे गरजेचे होते़ मात्र डॉ़ कमलाकर यांनी तसे न करता अर्भक कुटुंबीयाकडे सोपविले़ जिल्हा रुग्णालयातील या गर्भपात प्रकारणाचा भांडाफोड झाल्यानंतर डॉ़ लहाडे यांनी आरोग्य उपसंचालक व अतिरिक्त आरोग्य सचिव डॉ़ पाटील यांनी चौकशी केली़ या चौकशी अहवालानुसार हे तिघेही दोषी आढळून येत असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला़, तर चौकशी काळात पथकास अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचेही फिर्यादित नमूद करण्यात आले आहे़दरम्यान, डॉ़ डेकाटे यांनी दिलेल्या फिर्यादित डॉ़ लहाडे, डॉ़ कमलाकर व गर्भवती महिला, तिचे नातेवाईक यांनी संगनमताने २४ आठवड्यांचे स्त्री गर्भाचा २१ मार्च दुपारी चार ते २२ मार्च दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान सिव्हील हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला असून, गर्भपात कायद्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन व विनापरवाना अवैध गर्भपात केल्याचे म्हटले आहे़ त्यामुळे या तिघांवरही एमटीपी कायदा १९७१ च्या कलम ३, ४ (ब) व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात लहाडे यांनी अटकपूर्व जामिनावर न्यायालयात सुनावणी सुरू असली तरी हा नवीन व अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्याने त्यांना शोधण्याचे व अटक करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे़ (प्रतिनिधी)