नाशिक : वडाळागावातील सादिकनगरमधील एका खासगी दवाखान्यात बळजबरीने घुसून डॉक्टरला दमबाजी व मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित इरफान शेख ऊर्फ चिपड्या यास पोलिसांनी मंगळवारी (दि.२२) ताब्यात घेतले. यामुळे या भागातील रहिवासी महिला, युवकांनी थेट इंदिरानगर पोलीस ठाण्यातवर धडक दिली होती. या मोर्चामध्ये आमदार देवयानी फरांदेदेखील अग्रभागी होत्या हे विशेष! साथरोग कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे जमाव जमविल्याप्रकरणी संशयित फरांदे यांच्यासह सुमारे दोनशे मोर्चेकऱ्यांविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सादिकनगर येथील एका पीडित विवाहितेसोबत चुकीचे वर्तन केल्याच्या संशयावरून संशयित इरफान व त्याच्या साथीदारांनी दवाखान्यात बळजबरीने प्रवेश करत धुडगूस घातला होता. यावेळी दवाखान्यातील साहित्यांची तोडफोड करत डॉक्टर मुश्ताक शेख यांना मारहाण करण्यात आली होती. शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित इरफानसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच पीडितेच्या फिर्यादीनुसार विनयभंगाच्या गुन्ह्यात डॉक्टर शेखलाही ताब्यात घेण्यात आले.दरम्यान, मंगळवारी सकाळी संशयित इरफान यास अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर हे कर्मचाऱ्यांसह सादिकनगरमध्ये गेले असता पोलिसांना पाहून इरफानने पळ काढण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनीही त्याचा पाठलाग केला. पळत असताना पायाला दगड लागल्याने तो रस्त्यावर पडला आणि पोलिसांनी तत्काळ त्याला धरून वाहनात डांबले. त्यास तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
इंदिरानगर पोलीस ठाणे : देवयानी फरांदे यांच्यासह २००मोर्चेकऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 16:26 IST
महिला, पुरुषांनी एकत्र येऊन इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोठ्या संख्येने धाव घेतली. यामुळे त्वरित पोलीस ठाण्यात उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखातेदेखील पोहोचले होते.
इंदिरानगर पोलीस ठाणे : देवयानी फरांदे यांच्यासह २००मोर्चेकऱ्यांवर गुन्हा
ठळक मुद्देबेकायदेशीर जमाव जमविल्याचा ठपकादवाखान्यातील साहित्यांची तोडफोडविनयभंगाच्या गुन्ह्यात डॉक्टरलाही ताब्यात घेण्यात आले