‘त्या’ स्मशानभूमीचा ‘स्पॉट पंचनामा’
By Admin | Updated: November 12, 2014 23:57 IST2014-11-12T23:56:37+5:302014-11-12T23:57:33+5:30
‘त्या’ स्मशानभूमीचा ‘स्पॉट पंचनामा’

‘त्या’ स्मशानभूमीचा ‘स्पॉट पंचनामा’
सिन्नर : मूलभूत जनसुविधा योजनेतून कागदोपत्री अनेक कामे पूर्ण झाल्याचे दाखवून तीन लाख रुपयांचा निधी काढण्यात आलेल्या वावी येथील ‘त्या’ स्मशानभूमीला प्रभारी गटविकास अधिकारी व बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी समक्ष भेट देऊन सद्यस्थितीचा पंचनामा केला.
वावी येथील दलित बांधवांसाठी बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमीचे सुमारे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवून गेल्या आठ महिन्यापूर्वीच कणकेश्वर मजूर संस्थेने ३ लाख १३ हजार रुपयांचा निधी काढल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पंचायत समितीचे गटनेते उदय सांगळे यांनी पुराव्यानिशी उघड केले होते. याबाबतची सांगळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर प्रकरणात अधिकाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबतची गटविकास अधिकाऱ्यांकडे त्यांनी लेखी तक्रार केली होती. स्मशानभूमीचे काम न करता निधी काढल्याच्या प्रकाराची प्रभारी गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी गंभीर दखल घेतली. बांधकाम विभागाचे उपअभियंता शेखर मराठे व तक्रारदार उदय सांगळे यांच्यासह वाघ यांनी वावी गाठून झालेल्या व सुरू असलेल्या कामाचा पंचनामा केला. घटनास्थळी ताजे बांधकाम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतचा वस्तुस्थितिदर्शक पंचनामा वाघ व मराठे यांनी केला आहे. (वार्ताहर)