पतपुरवठा आराखड्यात १० टक्के वाढ
By Admin | Updated: April 28, 2017 02:33 IST2017-04-28T02:33:02+5:302017-04-28T02:33:11+5:30
नाशिक : जिल्ह्याच्या सन २०१७ - १८ या पतपुरवठा आराखड्यात गेल्या वर्षापेक्षा दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली

पतपुरवठा आराखड्यात १० टक्के वाढ
नाशिक : जिल्ह्याच्या सन २०१७ - १८ या पतपुरवठा आराखड्यात गेल्या वर्षापेक्षा दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, गुरुवारी या संदर्भात झालेल्या बैठकीत पतपुरवठा आराखड्याला मंजुरी देण्यात आली. सर्वाधिक वाढ कृषी क्षेत्रात करण्यात आल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, महाराष्ट्र बॅँकेचे सरव्यवस्थापक सी. के. वर्मा, विभागीय व्यवस्थापक आर. एम. पाटील, लीड बॅँक मॅनेजर अशोक चव्हाण हे उपस्थित होते. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात १२६० कोटी रुपयांचा पत आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. यंदा त्यात ९.९० टक्क्यांनी वाढ करण्यात येऊन तो १३,२५५ कोटी इतका करण्यात आला आहे. त्यात प्राधान्य क्रम सेक्टरसाठी १०२५५ कोटी रुपयांची तरतूद असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यात वाढ करण्यात आली.प्राधान्यक्रम सेक्टरसाठी ९५९ कोटींची तरतूद होती. पीककर्जासाठी ४०११ कोटींची तरतूद आहे. कृषी क्षेत्रातील योजना पाहता कृषी क्षेत्रासाठी ६१०० कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आल्याने चालना मिळणार आहे.