नाशिकरोड : मत्स्य व्यवसाय करण्यासाठी केंद्र शासनाने किसान क्रेडिट कार्ड ही सुविधा मंजूर करून दिली असून, संबंधितांनी जवळच्या राष्टÑीयीकृत बॅँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील मत्स्य व्यवसाय नाशिक कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या २०१८-१९च्या आर्थिक वर्षामध्ये मत्स्य व्यवसाय करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड या सुविधेस मंजुरी देण्यात आली आहे. सदर योजनेत मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक असलेले मत्स्यबीज, खाद्य, खते, विक्री व्यवस्था, तलाव ठेका यासारख्या गोष्टींसाठी कर्जसुविधा उपलब्ध करून दिली असून संबंधितांनी जवळच्या राष्टÑीयकृत बॅँकेशी संपर्क साधावा. माहितीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त सुजाता साळुंके यांनी केले आहे.
मत्स्य व्यवसायासाठी क्रेडिट कार्ड सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:31 IST