विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करा

By Admin | Updated: September 6, 2016 22:36 IST2016-09-06T22:35:07+5:302016-09-06T22:36:21+5:30

आर. डी. दरेकर : सिन्नर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमप्रसंगी प्रतिपादन

Create a place of respect for the students | विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करा

विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करा

सिन्नर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित जोपासून त्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करावे, असे प्रतिपादन नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी केले.
सिन्नर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात लायन्स क्लबच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष कृष्णाजी भगत, विभागीय अध्यक्ष हेमंत वाजे, अध्यक्ष संजय झगडे, सचिव भूषण क्षत्रिय, खजिनदार अनिल दराडे, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, प्रकल्पप्रमुख संजय सानप, डॉ. प्रशांत गाडे, घनश्याम देशमुख, मनीष गुजराथी, आर. के. मुंगसे, उपप्राचार्य टी. बी. खालकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाजे विद्यालयाच्या गीतमंचाने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
लायन्सचे अध्यक्ष झगडे यांनी प्रास्ताविकात राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक विभागात वैशाली सायाळेकर व मनोहर आव्हाड, माध्यमिक विभागात वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ म्हस्के, डुबेरे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी रहाटळ तर माध्यमिक विभागात डॉ. गणेश पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. भरत गारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विजय लोहारकर यांनी आदर्श शिक्षकांच्या कार्याची माहिती सांगितली. संगीता कट्यारे व अपर्णा क्षत्रिय यांनी सूत्रसंचालन केले. संजय सानप यांनी आभार मानले.
याप्रसंगी तेजस्विनी वाजे, वैशाली सानप, डॉ. सुजाता लोहारकर, शुभांगी झगडे, सुरेश कट्यारे, पांडुरंग वारुंगसे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर गंगावणे, वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे, पर्यवेक्षक सोपान येवले आदिंसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Create a place of respect for the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.