संभाजी स्टेडियमच्या रस्त्यावर भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:58 IST2020-07-25T20:42:39+5:302020-07-25T23:58:22+5:30

सिडको : येथील राजे संभाजी स्टेडियमसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक भगदाड पडल्याने काहीकाळ वाहतूक थांबविण्यात आली होती. ऐन सकाळच्या सुमारास अचानक पडलेले भगदाड सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

Crash on the road to Sambhaji Stadium | संभाजी स्टेडियमच्या रस्त्यावर भगदाड

संभाजी स्टेडियमच्या रस्त्यावर भगदाड

ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला । काही काळ वाहतूक थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : येथील राजे संभाजी स्टेडियमसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक भगदाड पडल्याने काहीकाळ वाहतूक थांबविण्यात आली होती. ऐन सकाळच्या सुमारास अचानक पडलेले भगदाड सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
शनिवार (दि.२४) रोजी सुरेश आव्हाड हे राजे संभाजी स्टेडियमसमोरील मुख्य रस्त्याने जात असताना त्यांना अचानक रस्त्याला भगदाड पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती प्रभागाच्या महिला नगरसेवक कावेरी घुगे व गोविंद घुगे यांना कळवली. घुगे यांनी तत्काळ याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना कळवून घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, सदरचा खड्डा हा सुमारे १० ते १५ फूट खोल होता. या खड्ड्यालगतच मोठी पावसाळी गटार असून, सदर खड्डा लक्षात आला नसता तर मोठा अपघात घडला असता, सुदैवाने मोठी घटना घडायच्या आतच मनपाने याठिकाणी त्वरित बॅरिकेट््स लावल्याने हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.

Web Title: Crash on the road to Sambhaji Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.