काजू समजून खाल्ल्या एरंडाच्या बिया
By Admin | Updated: January 18, 2016 23:08 IST2016-01-18T23:07:45+5:302016-01-18T23:08:15+5:30
काजू समजून खाल्ल्या एरंडाच्या बिया

काजू समजून खाल्ल्या एरंडाच्या बिया
नाशिक : जुने नाशिक येथील मुलांनी काजू म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झालेल्या मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले.
रविवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास पतंग उडविल्यानंतर खडकाळी भागातील सहा ते तेरा वर्षे वयोगटातील सुमारे पंधरा मुले रसूलबाग कब्रस्तानामध्ये पाणी पिण्यासाठी गेले होते. यातील एकाने काजू म्हणून जमिनीवर पडलेल्या एरंडाच्या बिया खाल्ल्यानंतर त्याने इतरांनाही काजू खात असल्याचे असल्याचे सांगितल्याने सर्व मुलांनीही एरंडाच्या बिया खल्ल्या. संध्याकाळी साडेपाच वाचेच्या सुमारास जेव्हा ही सर्व मुले घराकडे परतण्यासाठी बाहेर निघाली तेव्हा रस्त्यावरील एका दुकानदाराचे त्यांच्या हातातील बियांकडे लक्ष गेले त्याला संशय आल्याने ‘तुम्ही या बिया खाल्ल्या का’ असे विचारले असता सर्वांनी होकार दिला. याचवेळी काहींना उलट्या व अतिसार सुरू झाल्याने सर्वांना रिक्षांमधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बारा मुलांना अतिसार व उलट्यांचा त्रास झाला. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.