मोर्चाप्रकरणी सीटूच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 4, 2016 00:10 IST2016-04-03T23:52:31+5:302016-04-04T00:10:55+5:30
मोर्चाप्रकरणी सीटूच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मोर्चाप्रकरणी सीटूच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
नाशिक : आदिवासी विकास भवन ते शासकीय विश्रामगृहावर विनापरवानगी मोर्चा काढून वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सीटूच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कामगारांचे विविध प्रश्न मांडून निवेदन देण्यासाठी शनिवारी (दि़२) सीटूने मोर्चाचा मार्ग अवलंबिला होता़
भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री दोन दिवसांत नाशिक मुक्कामी होते़ मुख्यमंत्री गोल्फ क्लब विश्रामगृहावर येणार असल्याने सीटूचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोल्फ क्लब मैदानावर जमले होते़
यानंतर सीटूचे सरचिटणीस डॉ़ डी़ एल़ कराड, संतोष काकडे, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, हरिभाऊ तांबे व सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत गोल्फ क्लब मैदान, त्र्यंबक नाका सिग्नल, आदिवासी विकास भवन ते गडकरी चौकमार्गे शासकीय विश्रामगृह असा मोर्चा काढला होता़ यामोर्चात
सिटू आणि डाव्या आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने रस्त्यावर गर्दी झाली
होती.
या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे कारणाने पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांवर जमावबंदीचा आदेश झुगारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)