भाकपाचे समर्थन, राष्ट्रवादीकडून निषेध

By Admin | Updated: July 6, 2014 00:46 IST2014-07-06T00:46:42+5:302014-07-06T00:46:54+5:30

भाकपाचे समर्थन, राष्ट्रवादीकडून निषेध

CPI support, protests from NCP | भाकपाचे समर्थन, राष्ट्रवादीकडून निषेध

भाकपाचे समर्थन, राष्ट्रवादीकडून निषेध

 

नाशिक : राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या बेमुदत संप आंदोलनाची शासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. या संपामुळे रुग्णसेवा ठप्प झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
जिल्हा सचिव कॉ. राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात सरकार जाणून बुजून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे महाराष्ट्रात रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्याची तक्रार करण्यात आली. यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांना निवेदन देण्यात आले, त्यात शासनाने वैद्यकीय अधिकारी संघटनेशी चर्चा करून त्वरित मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात दत्तू तुपे, राजपाल शिंदे, राजू उदमले, रमेश ठाकूर, किरण मालुंजकर, व्ही. डी. धनवटे, संगीता उदमले, विमल पोरजे आदि सहभागी झाले होते.
संपकरी डॉक्टरांवर कारवाई करा
दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ग्राहक संरक्षण समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संपावर गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार ते पाच दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी संपावर गेले असून, रुग्णांचे हाल होत आहेत. खासगी रुग्णालयात जाऊन त्यांना उपचार करून घ्यावे लागत असल्याने शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व आडमुठेपणा करीत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध मेस्मा अंतर्गत कारवाई करून त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी अ‍ॅड. सुरेश आव्हाड, सुरेश खेताडे, डॉ. रामराव पाटील, बाजीराव घुगे, सदाशिव नाईक, ललित शिंदे, मंगला चव्हाण, सनी भडांगे, नंदा वाकडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: CPI support, protests from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.