गायींची वाहतूक करणाऱ्यांना अटक; एकाचा शोध सुरु
By Admin | Updated: March 17, 2017 00:43 IST2017-03-17T00:42:21+5:302017-03-17T00:43:07+5:30
देवळाली कॅम्प : गेल्या मंगळवारी (दि.१६) लहवित-भगूर मार्गावरून पिकअप जीपमधून अवैधरीत्या तीन गायी व एका वासरूची वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.

गायींची वाहतूक करणाऱ्यांना अटक; एकाचा शोध सुरु
देवळाली कॅम्प : गेल्या मंगळवारी (दि.१६) लहवित-भगूर मार्गावरून पिकअप जीपमधून अवैधरीत्या तीन गायी व एका वासरूची वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवळाली कॅम्प पोलिसांनी लहवित रस्त्यावरून संशयास्पदरीत्या जाणाऱ्या एका जीपला (एमएच १४, एएच ९७५५) अडविले. जीपची झडती घेतली असता त्यामधून तीन गायी व एका वासरूची अवैधरीत्या कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी संशयित आरोपी जुबेर अली हारुन (३५), रमजान शेख (२५, दोघे रा. भद्रकाली) यांना ताब्यात घेत बुधवारी उशिरा त्यांच्यावर प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचा एक साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कॅम्प परिसरातून गायींची अवैध वाहतूक तसेच जनावरे चोरीच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. (वार्ताहर)