पेठ : आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोपुर्ली खुर्द व ग्रामपंचायत कोपुर्ली खुर्द यांच्या सहकार्याने पेठ तालुक्यातील डोमखडक येथे शुक्रवारी (दि.१८) नागरिकांनी कोरोना लसीकरणाला उदंड प्रतिसाद दिला.गत अनेक दिवसांपासून आरोग्य विभाग नागरिकांना प्रबोधन, समुपदेशन करीत होते. तरीही नागरिक कोरोना लसीकरण घेण्यास पुढे येत नव्हते. ऐकीव अफवा, गैरसमज, चुकीच्या माहितीमुळे नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. अखेर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीबाबत समस्या -अडचणी समजून त्याप्रमाणे समुपदेशन केले असता लाभार्थी लस घेण्यास तयार झाले. यावेळी गावातील ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.यावेळी कोपुर्ली खुर्द उपकेंद्राचे सीएचओ योगेश्वर कहांडोळे, आरोग्यसेवक किसन ठाकरे, सुमित्रा चौधरी, रंजना कामडी, सरपंच हेमराज जाधव व ग्रामपंचायत सदस्य, वनविभागाचे कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.(१९ पेठ ४)डोमखडक येथे लसीकरण मोहीम प्रसंगी आरोग्य व वनविभागाचे कर्मचारी.
डोमखडक येथे कोविड लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 00:41 IST
पेठ : आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोपुर्ली खुर्द व ग्रामपंचायत कोपुर्ली खुर्द यांच्या सहकार्याने पेठ तालुक्यातील डोमखडक येथे शुक्रवारी (दि.१८) नागरिकांनी कोरोना लसीकरणाला उदंड प्रतिसाद दिला.
डोमखडक येथे कोविड लसीकरण मोहीम
ठळक मुद्देआरोग्य विभाग नागरिकांना प्रबोधन, समुपदेशन