बसथांब्यासमोरील महावितरणच्या रोहित्रांची झाकणे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:38 IST2018-07-21T00:36:38+5:302018-07-21T00:38:43+5:30

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर, नेहरूनगर व अंधशाळा बसथांब्यासमोरील महावितरणच्या डिस्ट्रिब्युशन बॉक्सचे झाकणे चोरीला गेल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Cover of Rohit's lamps in front of bus station | बसथांब्यासमोरील महावितरणच्या रोहित्रांची झाकणे लंपास

बसथांब्यासमोरील महावितरणच्या रोहित्रांची झाकणे लंपास

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर, नेहरूनगर व अंधशाळा बसथांब्यासमोरील महावितरणच्या डिस्ट्रिब्युशन बॉक्सचे झाकणे चोरीला गेल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.  उपनगर, नेहरूनगर, अंधशाळा बसथांब्यासमोर महावितरण कंपनीकडून विद्युत खांबाला जमिनीलगत पत्र्याचे डिस्ट्रीब्युशन बॉक्स लावण्यात आले आहे. मात्र भुरट्या चोरट्यांनी त्या डिस्ट्रीब्युशन बॉक्सचे पत्र्याचे दरवाजे चोरून नेल्याने डिस्ट्रीब्युशन बॉक्स उघडा पडला आहे. त्यामधील वायर व इतर साहित्य उघडे पडले असून, जमिनीपासून थोड्याशा उंचीवर असलेल्या डिस्ट्रीब्युशन बॉक्सला लहान मुले, अथवा कोणाचाही सहजरीत्या धक्का लागू शकतो.  झाकण नसलेल्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्समध्ये पावसाचे पाणी जाऊन शॉर्टसर्किट होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष देऊन डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचे झाकण लावून सुरक्षितेच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे.

Web Title: Cover of Rohit's lamps in front of bus station

टॅग्स :electricityवीज