आज मंगळवारी गुढीपाडवा तर बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची शासकीय सुटी असल्याने न्यायालयीन कामकाज बंद राहणार आहे. तसेच उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार दिनेश सुराणा यांनी काढलेल्या आदेशानुसार येत्या गुरुवारी व शुक्रवारीदेखील न्यायालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर शनिवार व रविवारी शासकीय सुटी असल्याने न्यायालयाला सलग सुटी लागोपाठ जाहीर झाल्या आहेत. एकूणच या आठवड्यात न्यायालयीन कामकाज केवळ सोमवारी चालले. आता पुढील सोमवारपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद राहणार आहे. आठवड्यात दोन दिवस शासकीय सुटी आल्यामुळे उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने दोन दिवसांची सुटी जाहीर करत हा संपूर्ण आठवडा सुटीचा पूर्ण केला आहे. यामुळे न्यायालयाच्या आवारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण येऊन कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
आठवडाभर न्यायालये राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:14 IST