अटी-शर्तींवर वृक्षतोडीस न्यायालय राजी
By Admin | Updated: May 8, 2015 23:49 IST2015-05-08T23:28:22+5:302015-05-08T23:49:13+5:30
रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी : काही अटींमुळे मात्र अनेक रस्ते रखडणार

अटी-शर्तींवर वृक्षतोडीस न्यायालय राजी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या रुंदीकरण कामात अडथळा ठरणारी सुमारे २४०० झाडांपैकी काही झाडे अटी-शर्तींवर तोडण्याची परवानगी न्यायालयाने दिल्याचे वृत्त आहे. या निर्णयामुळे रुंदीकरणाचा एकदाचा प्रश्न मार्गी लागणार असला तरी न्यायालयाने घातलेल्या काही अटींमुळे अनेक रस्त्यांचे रुंदीकरण रखडण्याचीच शक्यता अधिक आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, गंगापूररोड, दिंडोरीरोड, वडाळा, पाथर्डी आदि भागांतील सुमारे २४०० झाडे रस्त्यात येत आहेत.