मुक्त विद्यापीठात औद्योगिक कामगारांसाठी अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:50 IST2019-07-30T00:49:43+5:302019-07-30T00:50:20+5:30

औद्योगिक क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदविका अथवा तत्सम प्रशिक्षण देण्यासंदर्भात निमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्यासमवेत विचारविनिमय बैठक घेण्यात आली.

 Courses for Industrial Workers at Free University | मुक्त विद्यापीठात औद्योगिक कामगारांसाठी अभ्यासक्रम

मुक्त विद्यापीठात औद्योगिक कामगारांसाठी अभ्यासक्रम

सातपूर : औद्योगिक क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदविका अथवा तत्सम प्रशिक्षण देण्यासंदर्भात निमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्यासमवेत विचारविनिमय बैठक घेण्यात आली.
औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार, सुपरवायझर तसेच कर्मचारी यांच्याकडे संबंधित काम करण्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र नसते. सदर कामगार तसेच सुपरवायझरला पदविका (डिप्लोमा) अथवा तत्सम प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्यात आल्यास त्याची उत्पादकता व कार्यक्षमता वाढून सदर प्रमाणपत्राचा लाभ त्या कर्मचाºयास भविष्यात होऊ शकतो व उद्योगासदेखील अशा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा उपयोग होऊ शकतो. याबाबत निमाचे पदाधिकारी व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांची बैठक घेण्यात आली. भविष्यात संयुक्त वाटचाल कशी करता येईल, यासंदर्भातील विचारविनिमय करण्यात आला. उद्योगांमध्ये असलेली कुशल मनुष्यबळाची आवश्यकता व शिक्षण घेऊन बाहेर पडणारे कुशल विद्यार्थ्यांचे प्रमाण यात ताळमेळ साधण्यास पूरक ठरणार आहे. यावेळी निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, कार्यकारिणी सदस्य रावसाहेब रकिबे, एन. डी. ठाकरे, संजय महाजन, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. दिनेश भोंडे, प्राचार्य माधव पळशीकर, डॉ. प्रकाश अतकरे, विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Web Title:  Courses for Industrial Workers at Free University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.