साहसी मोहिम : भारतीय तोफखान्याचे जवान ‘गंगोत्री’च्या स्वारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 02:35 PM2019-09-08T14:35:32+5:302019-09-08T14:42:59+5:30

गंगोत्री-१ची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६ हजार ६२० मीटर, गंगोत्री-२ची उंची ६ हजार ५९० मीटर आणि गंगोत्री-३ची उंची ६ हजार ५७७ मीटर इतकी आहे. २६ तारखेपर्यंत चमू गंगोत्री-३पर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवून आहे.

Courageous Expedition: Indian artillery man aboard 'Gangotri' | साहसी मोहिम : भारतीय तोफखान्याचे जवान ‘गंगोत्री’च्या स्वारीवर

साहसी मोहिम : भारतीय तोफखान्याचे जवान ‘गंगोत्री’च्या स्वारीवर

Next
ठळक मुद्देउत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या कुशीत ‘जोश’सोबत ‘होश’ सांभाळून मोहीम फत्ते करावयाची आहे,नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या १८ जवानांचा चमू रवाना

नाशिक : मागील दहा वर्षांमध्ये कुठल्याही सेनेच्या चमूने उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या कुशीत असलेल्या गंगोत्री-१, २ व ३ हे पर्वत सर करण्याचे लक्ष्य घेऊन नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या १८ जवानांचा चमू शनिवारी (दि.७) सकाळी रवाना झाला. मेजर जनरल संजय थापा यांनी ध्वज देऊन चमूला ‘मिशन गंगोत्री’साठी शुभेच्छा दिल्या. चमूने ही मोहीम यशस्वीपणे ‘फत्ते’ केल्यास तोफखान्यासह भारतीय सेनेच्या इतिहासात एका वेगळ्या साहसी विक्रमाची नोंद होईल.

तोफखाना केंद्राच्या जवानांनी गंगोत्री पर्वतारोहणाची साहसी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेवर केंद्रातील १८ जवान सहभागी झाले असून, मेजर करण दया, मेजर जे. एस. सोढी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून (दि.९) जवानांचा चमू पर्वतावर चढाई करण्यास सुरुवात करणार आहे. गंगोत्री-१ची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६ हजार ६२० मीटर, गंगोत्री-२ची उंची ६ हजार ५९० मीटर आणि गंगोत्री-३ची उंची ६ हजार ५७७ मीटर इतकी आहे. २६ तारखेपर्यंत चमू गंगोत्री-३पर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवून आहे. या संपूर्ण मोहिमेचा कालावधी १० आॅक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आला आहे.

या चमूला गंगोत्री मोहिमेसाठी ध्वजप्रदान करताना मेजर जनरल थापा म्हणाले, निसर्गापुढे कोणाचेही चाललेले नाही हा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. निसर्गाशी जो खेळण्याचा प्रयत्न करतो त्याला निसर्ग कधीही माफ करत नाही. त्यामुळे वातावरणातील आव्हाने, धोके ओळखून गंगोत्रीची चढाई यशस्वी करावी. ‘जोश’सोबत ‘होश’ सांभाळून मोहीम फत्ते करावयाची आहे, याचा विसर पडू देऊ नये, असा सल्ला त्यांनी यावेळी चमूला दिला.

मागील दहा वर्षांचा इतिहास बघता गंगोत्रीचे तीनही पर्वत अद्याप कुठल्याही सेनेच्या चमूने सर केलेले नाही. बर्फाळ प्रदेशात उणे तपमानात राहून तोफखान्याचे साहसी जवान या मोहिमेवर निघाले असून, २० दिवसांमध्ये गंगोत्री-३पर्वताच्या पायथ्याला पोहचण्याचे ध्येय या चमूने डोळ्यांपुढे ठेवले आहे. या साहसी मोहिमेदरम्यान तांत्रिक कौशल्य, अनुभव, प्रेरणा, शारीरिक, मानसिक क्षमतेची कसोटी लागणार आहे. यासाठी जवानांना विविध नैसर्गिक वातावरणाच्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Courageous Expedition: Indian artillery man aboard 'Gangotri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.