शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

सराईत गुन्हेगारांनी दाम्पत्यास मारहाण करत लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 16:05 IST

पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी अन्य पोलीस ठाण्यातून आल्याने त्यांना हद्दीची देखील व्यवस्थित माहिती नाही अनेक सराईत गुन्हेगार तडीपार आरोपी बिनधास्तपणे पंचवटीत वास्तव्य....

ठळक मुद्देकारची फोडली काच, पत्नीचे हिसकावले मंगळसूत्रगुन्हे शोध पथक भरकटले

नाशिक : जुने नाशिकमधील परिसरात राहणाऱ्या एका युवकाच्या चारचाकी वाहनाची काच फोडून त्यास बेदम मारहाण करत सराईत गुन्हेगारांनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी अन‌् पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रही बळजबरीने हिसकावून नेल्याचे उघडकीस आले आहे.कथडा परिसरातील भोई गल्ली भागात राहणारे फिर्यादी नदीम निसार खान हे त्यांच्या पत्नीसमवेत पंचवटी भागात जात असताना संशयित विकी बजाज, गुड्डू फसाळे, अजय कुंदे व अजय पूर्ण (सर्व रा. गणेशवाडी) नाव माहीत नाही यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काल सायंकाळी खान हे गणेशवाडीत असताना संशयितांनी त्यांच्या फोर्डफिगो कारजवळ (एमएच १५ सिटी ९०९१) येऊन काचेवर हात मारून काच फोडली तसेच नदीमला बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची चैन तसेच त्याच्या पत्नीच्या गळ्यातून मंगळसूत्र असे ६० हजार रुपये किमतीचे दागिने बळजबरीने चोरून नेले. तसेच मारहाण करून दागिने पळविणाऱ्या टोळीतील काही संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात जबरी लूट चोरी, गुन्हे दाखल आहेत तर एकाला तडीपार करण्यात आले होते, तरीदेखील त्याचे परिसरात वास्तव्य असल्याने पोलिसांच्या गस्तीविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गुन्हे शोध पथक भरकटलेपंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी अन्य पोलीस ठाण्यातून आल्याने त्यांना हद्दीची देखील व्यवस्थित माहिती नाही अनेक सराईत गुन्हेगार तडीपार आरोपी बिनधास्तपणे पंचवटीत वास्तव्य करत असले तरी याबाबत गुन्हे शोध पथकातील नव्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याने गुन्हेगारांचे फावत आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी