शिवडे शिवारात दाम्पत्यावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST2021-06-20T04:12:01+5:302021-06-20T04:12:01+5:30

शिवडे गावात मराठी शाळेजवळ शनिवारी (दि.१९) सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास गोळीबार झाला. गोळीबार केल्यानंतर संशयित युवक फरार झाला असून, ...

Couple shot at Shivde Shivara | शिवडे शिवारात दाम्पत्यावर गोळीबार

शिवडे शिवारात दाम्पत्यावर गोळीबार

शिवडे गावात मराठी शाळेजवळ शनिवारी (दि.१९) सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास गोळीबार झाला. गोळीबार केल्यानंतर संशयित युवक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शिवडे गावात ठाकरवाडी भागात राहणाऱ्या रावसाहेब नामदेव कातोरे (३७) याचे भावजईसोबत संबंध असल्याच्या संशयातून अशोक नामदेव मेंगाळ या संशयित युवकाने त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात रावसाहेब कातोरे याच्या उजव्या हाताला गोळी लागून तीच गोळी त्याची पत्नी मनीषा रावसाहेब कातोरे यांच्या पोटात घुसली. यात मनीषा कातोरे गंभीर जखमी झाल्या. दोघाही जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोळीबारानंतर संशयित अशोक नामदेव मेंगाळ हा फरार झाला आहे.

इन्फो

कारण अद्याप अस्पष्ट

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्यासह सिन्नर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दुपारी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे या वरिष्ठांनी भेटी देऊन तपासकामी सूचना केल्या. गोळीबार करण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. संशयित अशोक नामदेव मेंगाळ याच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी करीत आहेत.

Web Title: Couple shot at Shivde Shivara