दिंडोरी : घरगुती वादातून विहिरीत उडी घेतलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा पत्नीसह पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिंडोरी येथे घडली. काळू उखा पवार (४२) व निर्मला काळू पवार (३५) असे मृत दांपत्याचे नाव आहे.याबाबत दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार दांपत्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. त्यांचे मूळ गाव इंदिरानगर, पळसविहिर येथील आहे. गुरु वारी सकाळी घरगुती वाद झाल्याने निर्मला घराबाहेर निघून गेली होती. सायंकाळी तिचा शोध घेत नवरा काळू उमराळे रोडकडे पोहोचला. यावेळी एका विहिरीजवळ निर्मला बसलेली दिसली. मात्र, तिने नवऱ्याला बघताच विहिरीत उडी घेतली. तिला वाचवण्यासाठी काळूनेही विहिरीत उडी घेतली. मात्र, दोघेही पाण्यात बुडाले.याप्रकरणी दिंडोरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर आव्हाड, नंदू वाघ आदी करत आहेत. या घटनेची माहिती समजताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. अखेर शुक्र वारी (दि.२१) सकाळी त्यांचे मृतदेह हाती लागले. दिंडोरी ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विहिरीत बुडून दांपत्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:18 IST
घरगुती वादातून विहिरीत उडी घेतलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा पत्नीसह पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिंडोरी येथे घडली. काळू उखा पवार (४२) व निर्मला काळू पवार (३५) असे मृत दांपत्याचे नाव आहे.
विहिरीत बुडून दांपत्याचा मृत्यू
ठळक मुद्देघरगुती वाद : दिंडोरी येथील हृदयद्रावक घटना