आर्थिक देवाणघेवाणीतून दाम्पत्यावर हल्ला
By Admin | Updated: April 10, 2015 00:17 IST2015-04-10T00:03:29+5:302015-04-10T00:17:35+5:30
आर्थिक देवाणघेवाणीतून दाम्पत्यावर हल्ला

आर्थिक देवाणघेवाणीतून दाम्पत्यावर हल्ला
सिडको : आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून दाम्पत्याचे अपहरण करून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा प्रकार सिडकोत घडला आहे. याबाबत दोघा संशयितांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक संशयित अद्यापही फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी दीपक व मानसी पटवारी या खुटवटनगर येथे राहणाऱ्या दाम्पत्याचे आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून संशयित मुकुंद बंग, गोविंद टोपसे (रा. पुणे) व त्यांच्या आणखी एका साथीदाराने चारचाकी वाहनातून अपहरण केले होते. त्यांना दमबाजी करून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. या दाम्पत्याने त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करीत अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, दाम्पत्यास उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, दोघा संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांचा तिसरा साथीदार फरार असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले.
पटवारी यांचा आॅनलाइन ट्रेडिंगचा व्यवसाय असून, महात्मानगर येथे त्यांचे कार्यालय आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते नाशिकमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करीत आहेत. यापूर्वी त्यांचा पुणे येथे हाच व्यवसाय सुरू होता. त्यानंतर त्यांनी नाशिकमध्येही व्यवसाय सुरू केला.
संशयित बंग आणि टोपसे यांचे या व्यवहारातून पटवारी यांच्याशी पुणे येथेच ओळख झाली होती. त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झाल्याचे समजते. मात्र पटवारी दाम्पत्याने नाशिकला व्यवसाय सुरू केल्यानंतर पुणे येथील बंग आणि टोपसे यांनी नाशिकला येऊन पटवारी यांच्याकडे मागील व्यवहाराच्या पैशांची मागणी केली होती.
यातूनहा हा अहपरण आणि हल्ल्याचा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. या संदर्भात पोलीस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)