शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवा हाच सैनिकाचा खरा धर्म - कर्नल उपेंद्र कुशवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 13:02 IST

 देशासाठी सेवा हाच खरा सैनिकाचा धर्म असल्याचे प्रतिपादन ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल उपेंद्र कुशवाह यांनी केले. त्यांनी सैनिकाची भूमिका आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देसैन्यात भरती झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कर्नल उपेंद्र कुशवाह यांनी दिले देससेवेचे धडे

नाशिक : देशासाठी सेवा हाच खरा सैनिकाचा धर्म असल्याचे प्रतिपादन ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल उपेंद्र कुशवाह यांनी केले. भारतीय सेनादलाच्या भरतीत निवड झालेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथील विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतानाच त्यांनी विद्याथ्यार्थ्यांना सैनिकाची भूमिका आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर  एन. सी. सी. अधिकारी लेफ्टनंट संदीप भिसे आदी उपस्थित होते.  प्रशिक्षण कालावधीत आरोग्याची काळजी घेणे, कोणतीही शारीरिक दुखापत होऊन देणे , मनोबल सक्षम व उच्च ठेवणे, आपसात प्रेमाची भावना, आपुलकी जोपासणे व देशभक्ती सदैव जागृत ठेवणे या गुणांची संवर्धन करणे गरजेचे आहे . तसेच तुमच्यावर घर परिवाराची जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी आहे. याकरिता स्वच्छ चारित्र्य ठेवणे गरजेचे आहे. सैनिक गणवेशाचा सन्मान करणे याही महत्त्वपूर्ण गोष्टींचा त्यांनी उल्लेख त्यांनी केला. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाणे व आपसात कोणत्याही पातळीवर भेदभाव न करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. धर्म , नाते, राजकारण, लिंग यावर कोणताही भेदभाव न करता एकोप्याने, एकजुटीने शिस्तीने प्रशिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला देतानाच भारतीय सैन्यदलात  राष्ट्रभक्ती, शिस्त, सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रशिक्षण सर्वोच्च स्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नासिक चे प्रशासकीय अधिकारी कर्नल अलोक कुमार सिंग , बीएचएम रफिक सर , पीआय स्टाफ  आदी यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :SoldierसैनिकNashikनाशिकStudentविद्यार्थी