श्री गणेश बॅँकेसाठी ५३़५ टक्के मतदान आज मतमोजणी :
By Admin | Updated: June 22, 2015 01:34 IST2015-06-22T01:33:46+5:302015-06-22T01:34:13+5:30
श्री गणेश बॅँकेसाठी ५३़५ टक्के मतदान आज मतमोजणी :

श्री गणेश बॅँकेसाठी ५३़५ टक्के मतदान आज मतमोजणी :
नाशिक : श्री गणेश सहकारी बॅँकेच्या १२ संचालक पदांसाठी रविवारी मतदान झाले़ त्यामध्ये ५३़५ टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला़ संचालक पदाच्या १२ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले़ दरम्यान, सोमवारी (दि.२२) सकाळी आठ वाजेपासून द्वारका येथील समर्थ मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली़ नाशिक येथील अभिनव बालविकास मंदिर, तसेच पिंपळगाव येथील क. का. वाघ महाविद्यालय या दोन्ही मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली़ श्री गणेश सहकारी बॅँकेचे ४ हजार ८८८ मतदार असून, सायंकाळी मतदान प्रकिया संपल्यानंतर अभिनव बालविकास मंदिर केंद्रावर २६०१ पैकी ११६९ (६२़३० टक्के) तर पिंपळगाव बसवंत येथील के.के.वाघ महाविद्यालय केंद्रावर २२८७ पैकी १४२४ (४४़९४ टक्के) मतदारांनी मतदान केले़ या निवडणुकीसाठी शरद कोशिरे यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश सहकारी बॅँक बचाव पॅनल, तर बॅँकेचे माजी अध्यक्ष माधवराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष पॅनलची निर्मिती करण्यात आली़ या दोन्ही पॅनलकडून संचालक मंडळाच्या संपूर्ण अर्थात १२ जागा लढविल्या जात असून, त्यामध्ये चार अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत़ या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून १४, इतर मागास प्रवर्गातून २, महिला राखीव गटातून ४, भटक्या विमुक्त जाती गटातून २, अनुसूचित जाती जमाती गटातून २ तसेच अन्य चार असे एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ दरम्यान, सोमवारी (दि.२२) सकाळी आठ वाजेपासून द्वारका येथील समर्थ मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरुवात होणार आहे़(प्रतिनिधी)