बालगुन्हेगारांचे करणार समुपदेशन

By Admin | Updated: November 19, 2015 00:25 IST2015-11-19T00:23:38+5:302015-11-19T00:25:18+5:30

पोलीस आयुक्तांचा उपक्रम : बालगुन्हेगारांचा प्रमाण चिंताजनक

Counsel for the Balchughars | बालगुन्हेगारांचे करणार समुपदेशन

बालगुन्हेगारांचे करणार समुपदेशन

नाशिक : शहराच्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली आहे़ या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढते बालगुन्हेगारांचे प्रमाण चिंताजनक असून, अशा बालगुन्हेगारांची मानसिकता बदलून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने पाऊल उचलले असून, लवकरच समुपदेशन केले जाणार आहे़
नाशिक शहरातील विविध गुन्ह्यांमध्ये गतवर्षी ८७ बालगुन्हेगारांचा सहभाग होता, तर यावर्षी यामध्ये वाढ झाली असून आॅक्टोबरपर्यंत ११० बालगुन्हेगारांचा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे़ अल्पवयीन मुलांचा हा वाढता सहभाग वाढल्याने पोलिसांसमोर आव्हान आहे़ बालगुन्हेगारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बाल न्यायालयामार्फत त्यांची रवानगी बाल सुधारगृहात केली जाते. मात्र त्यांची मानसिकता बदलतेच असे नाही, याउलट ते भविष्यात सराईत गुन्हेगार होण्याचीच शक्यता अधिक असते़
या बालगुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने प्रयत्न सुरू केले आहेत़ याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नुकतीच सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे, महिला व बाल कल्याण समितीच्या समुपदेशक दीपाली मानकर यांची बैठक झाली. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात बालगुन्हेगारांनी गुन्हेगारीपासून परावृत्त व्हावे यासाठी समुपदेशनाचे वर्ग सुरू केले जाणार आहे़ या बालगुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक व सेवाभावी संस्थांचीही मदत घेतली जाणार असून, वाट चुकलेल्या बालगुन्हेगारांना शिक्षणाचे महत्त्व, त्यांच्या मनात असलेले चंगळवादाचे दुष्परिणाम पटवून दिले जाणार आहेत.

Web Title: Counsel for the Balchughars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.