अधिकाऱ्यांमुळेच सभेस नगरसेवक गैरहजर

By Admin | Updated: September 22, 2015 23:58 IST2015-09-22T23:58:09+5:302015-09-22T23:58:36+5:30

अधिकाऱ्यांमुळेच सभेस नगरसेवक गैरहजर

Councilors absent from the meeting due to the officials | अधिकाऱ्यांमुळेच सभेस नगरसेवक गैरहजर

अधिकाऱ्यांमुळेच सभेस नगरसेवक गैरहजर

पूर्व प्रभाग : नगरसेवकांचा अधिकाऱ्यांवर आरोपइंदिरानगर : प्रभागातील समस्या मांडण्यासाठी नगरसेवक सभेत पोटतिडकीने विषय मांडतात. परंतु अधिकारी नगरसेवकांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नगरसेवक प्रभाग सभेस येण्यास अनुत्सुक असतात, असा आरोप नगरसेवकांनी केला.
पूर्व प्रभाग सभेत नेहमीप्रमाणेच नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या नकरात्मक मानसिकतेवर टीका केली. नगरसेवकांनी तक्रारी करूनही अधिकारी त्यांच्या कामाचा पाठपुरावा करीत नाहीत, असा आरोप नगरसेवकांनी केला. गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी यशवंत निकुळे यांनी केली.
प्रभाग ५३ हा सिडको व पूर्व प्रभागाच्या सीमारेषेवर आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची अडचण निर्माण होते. सर्वच कामे नगरसेवकांनी स्वखर्चाने करावे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वडाळागावात अनियमित घंटागाडी असते, याकडेही लक्ष वेधले.
नगरसेवक कुणाल वाघ, वत्सला खैरे, संदीप लेनकर, सुमन ओहळ, आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी २५ लाखांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Councilors absent from the meeting due to the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.