नगरसेवकाने घेतला घंटागाड्यांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 19:14 IST2017-09-16T19:14:22+5:302017-09-16T19:14:27+5:30

The councilor took control of the ghantagadas | नगरसेवकाने घेतला घंटागाड्यांचा ताबा

नगरसेवकाने घेतला घंटागाड्यांचा ताबा


नाशिक : येथील प्रभाग क्रमांक २९ मध्ये गेल्या दोन महीन्यांपासून घंटागाड्या ह्या नियमित येत नसल्याने प्रभागात ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचलेले आहे, त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत प्रभागाच्या नगरसेवक रत्नमाला राणे यांनी यांनी प्रभागातील घंटागाड्याच ताब्यात घेतल्या. मात्र, संबंधीत ठेकेदाराने नगरसेवकांना न जुमानता थेट अंबड पोलीस ठाणे गाठले. परंतू काही वेळातच तक्रार न देता ठेकेदारांने माघार घेणेच पसंत केल्याचा प्रकार शनिवारी घडला.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील उत्तमनगर ,सर्वेश्वर चौक,नंदनवन चौक,वासुदेव चौक, राजरत्ननगर यासंह परीसरात गेल्या दोन महीन्यांपासून घंटागाडी अनियमित येत असल्याने याबाबत नागरीकांनी नगरसेवक रत्नमाला राणे यांना कळविले. प्रभागात ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचलेले असून घरातील कचरा देखील घेण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनेकांना डेंग्यू तसेच स्वाइन फ्यू सदृश्य आजाराने ग्रासलेले असल्याचेही नगरसेवकांच्या लक्षात आणून दिले. याबाबत नगरसेवक राणे यांनी मनपाच्या संबंधित अधिकाºयांना अनेकदा सांगितले, परंतू संबंधीत ठेकेदार हे नगरसेवकांनाही जुमानत नसल्याने रत्नमाला राणे यांनी प्रभागात अनियमित फिरणाºया घंटागाड्या शोधुन त्या ताब्यात घेतल्या. याबाबतची माहिती घंटागाठी ठेकेदारास कळताच त्यांनी थेट नगरसेवकांच्या विरोधातच अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. परंतू ठेकेदाराने तक्रार न देताच माघारी फिरणेचे पसंत केल्याचे चित्र बघावयास मिळाले. प्रभागात अनियमित घंटागाडी फिरकत असल्याबाबत नगरसेवक राणे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली तसेच राणे यांना यापुढील काळात प्रभागातील घंटागाडी बाबातच्या सर्व तक्रारींचे निवारण केले जाईल असे लेखी पत्र दिले.

Web Title: The councilor took control of the ghantagadas