सुधारगृहातील मुलावर मनमाड येथे अत्याचार

By Admin | Updated: July 5, 2017 23:32 IST2017-07-05T23:31:52+5:302017-07-05T23:32:18+5:30

सुधारगृहातील मुलावर मनमाड येथे अत्याचार

Corruption at Manmad | सुधारगृहातील मुलावर मनमाड येथे अत्याचार

सुधारगृहातील मुलावर मनमाड येथे अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : येथील बालसुधारगृहातील कर्मचाऱ्याने एका सातवर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
येथील मनमाड-येवला मार्गावर मुलांचे बालसुधारगृह असून, या सुधारगृहात बेवारस फिरणारे, तसेच बालगुन्हेगारांना ठेवण्याची व्यवस्था आहे. सध्या या बालसुधारगृहात १८ मुले असून, त्यापैकी एका सातवर्षीय मुलावर संजय पोटिंदे या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलाने त्याच्यावर घडलेला प्रकार अन्य कर्मचाऱ्याला सांगितला. बालसुधारगृहाच्या अधिकाऱ्याने तातडीने जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला घडलऱ्या प्रकाराची माहिती कळवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनमाडला धाव घेऊन तपास केला. बालसुधारगृहाचे लिपिक मिखिल स्वर्गे यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्र ार दिली. या तक्र ारीवरून पोलिसांनी संजय पोटिंदे याच्याविरु द्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सी. बी. पाटील करीत आहेत.

Web Title: Corruption at Manmad