दलितवस्ती सुधार योजनेत भ्रष्टाचार

By Admin | Updated: April 28, 2017 01:24 IST2017-04-28T01:23:54+5:302017-04-28T01:24:07+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत चौदा लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे

Corruption in the dalitwasthi improvement scheme | दलितवस्ती सुधार योजनेत भ्रष्टाचार

दलितवस्ती सुधार योजनेत भ्रष्टाचार

सटाणा : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे दलितवस्ती सुधार योजना व नवबौद्ध वस्ती विकास योजनेंतर्गत कागदोपत्री कॉँक्रीट रस्त्यांची कामे मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करून सुमारे चौदा लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकाने संगनमत करून केलेल्या या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी प्रा. रमाकांत वामनराव पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.
सन २०१२ ते १६ या कालावधीत गावात दलितवस्ती सुधार योजना व नवबौद्ध वस्ती विकास योजनेंतर्गत शासनाकडून अंतापूर ग्रामपंचायतीला निधी प्राप्त झाला होता. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील आंबेडकरनगर वस्ती क्र. १ व २, रोहिदास वस्ती येथे रस्ता कॉँक्रीटीकरण करण्यासाठी अनुक्र मे पाच लाख ५०० रुपये, चार लाख ९९ हजार २५३ रु पये व चार लाख पाच हजार ४२ रु पये असा एकूण चौदा रुपये खर्चाच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. हा निधी खर्ची पाडून प्रत्यक्षात मात्र कॉँक्रीटीकरण न करता निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करण्यात आले आहे. हा भंडाफोड प्रा.पवार यांनी माहितीचा अधिकार वापरून मागविलेल्या माहितीतून उघडकीस आला आहे.
याप्रकरणी प्रा. पवार यांनी या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी सुधीर अहिरे, शेखर जाधव, राहुल पानपाटील, मिलिंद गरु ड, गणेश पवार, बाळासाहेब दाणी, सुनील मोरे, कैलास पवार, दौलत अहिरे, राजेंद्र दाणी, संजय अहिरे यांच्यासह सुमारे पस्तीस दलित कुटुंबप्रमुखांच्या सहींची मोहीम राबवून संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाप रिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Corruption in the dalitwasthi improvement scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.