नगरसेवक गजानन शेलार अखेर पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 11:09 IST2017-09-20T11:09:26+5:302017-09-20T11:09:35+5:30
गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करीत चिथावणी देत पोलिसांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी न्यालायाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.

नगरसेवक गजानन शेलार अखेर पोलिसांना शरण
नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डी जे चा दणदणाट करणे नगरसेवक गजानन शेलार यांना चांगलाच भोवला असून, आज शेलार स्वत:हून सकाळी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल होऊन पोलिसाना शरण आले.
गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करीत चिथावणी देत पोलिसांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलिसांनी यांच्या दंडे हनुमान मित्र मंडळावर गुुन्हा दाखल केला होता . न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.