नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: August 9, 2015 22:31 IST2015-08-09T22:30:41+5:302015-08-09T22:31:15+5:30
नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
आझादनगर : मालेगाव शहरातील सरदारनगर भागात जमीन व्यवहाराच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले तिसरा महाजचे नगरसेवक मोहंमद आमीन मोहंमद फारूक यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या फारूक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादात नगरसेवक मोहंमद आमीन हे मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने डोक्यावर लाकडी दांडक्याने आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला. ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्याने या प्रकरणी आझादनगर पोलिसांत आज रविवारी संध्याकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. फारूक शुद्धीवर येताच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करू, असे आझादनगरचे पोलीस निरीक्षक खान यांनी सांगितले. (वार्ताहर)