नगरसेवक आक्रमक

By Admin | Updated: July 30, 2016 00:51 IST2016-07-30T00:50:17+5:302016-07-30T00:51:30+5:30

सिडको प्रभाग सभा : अधिकाऱ्यांकडून नागरी कामांबात टाळाटाळ

Corporator aggressor | नगरसेवक आक्रमक

नगरसेवक आक्रमक

सिडको : अनियमित घंटागाडी, अनधिकृत भाजीबाजाराचा वाढत्या त्रासाबरोबरच सिडको भागात डेंग्यू रुग्णांची वाढलेली संख्या यांसह विविध कामांबाबतच्या तक्रारींचा पाढाच आजच्या प्रभागसभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसमोर मांडत आक्रमक भूमिका घेतली.
सिडको प्रभागची सभा प्रभाग सभापती अश्विनी बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी सुमारे दहा लाखांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. प्रभागसभा सुरू होताच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत अधिकारी कामकाजच करीत नसल्याचा आरोप केला. नगरसेवक कल्पना पांडे यांनी सांगितले की, प्रभागात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली असतानाही मनपा प्रशासन सुस्तावलेले दिसत आहे. प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच धूर तसेच औषध फवारणी करण्याबाबत सांगितले, परंतु याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचे आरोपही पांडे यांनी केला. नगरसेवक रत्नमाला राणे यांनीही प्रभागातील नाले साफ होत नसल्याचे सांगत, अधिकारी हे नगरसेवकांनी सांगितलेली कामे करीत नसल्याचेही सांगितले. नगरसेवक सुवर्णा मटाले यांनी सांगितले की, प्रभातातील माउली लॉन्स येथे अतिक्रमण करून व्यवसाय करणारे व्यावसायिक आता नागरिकांना दमबाजी करीत आहे. सदरचा भाजीबाजार याठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यासाठी प्रभागात स्वतंत्र जागादेखील अधिकऱ्यांना सुचविली आहे. याबाबत त्वरित निर्णय करण्याची मागणीही मटाले यांनी केली.
नगरसेवक शोभा फडोळ यांनीही प्रभागातील नाले साफसफाई होत नसल्याचे सांगत प्रभागात अनियमित घंटागाड्यांमुळे कचऱ्याचे ढीग साचल्याचेही फडोळ यांनी सांगितले. नगरसेवक शोभा निकम यांनीही अधिकारी कामे करीत नसल्याचे सांगितले. नगरसेवक वंदना बिरारी यांनी झाडाचा पालापाचोळा हा उचलला जात नसल्याने रस्त्यांना बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे सांगत प्रभागातील अनेक पथदीप बंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी सांगितले की, अधिकारी हे नागरिकांच्या कामाबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत प्रभागातील नाले अद्यापही साफ करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक अनिल मटाले, उत्तम दोंदे, हर्षा बडगुजर, कांचन पाटील आदिंसह विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांसह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Corporator aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.