सावतानगर येथे मनपाचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:13 IST2021-04-12T04:13:23+5:302021-04-12T04:13:23+5:30

दिली. शहरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण सिडको भागात आहे. त्यामुळे सिडको विभाग कोरोना हॉट स्पॉट झाला आहे. मनपा ...

Corporation's Kovid Center at Sawtanagar | सावतानगर येथे मनपाचे कोविड सेंटर

सावतानगर येथे मनपाचे कोविड सेंटर

दिली.

शहरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण सिडको भागात आहे. त्यामुळे सिडको विभाग कोरोना हॉट स्पॉट झाला आहे. मनपा आयुक्तांनी या कोविड सेंटरला मान्यता दिली असून मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांनी सावतानगर येथील सावरकर हॉल व रायगड चौक येथील मनपा शाळेच्या सभागृहाची पहाणी केली. या नंतर सावतानगर येथील क्रॉम्टन हॉल ( सावरकर हॉल ) येथे ६० ऑक्सिजन बेड, आयसीयु विभाग व रायगड चौक मनपा शाळेत १०० बेड असे १६० बेड उभारण्याचे कामाला सुरूवात झाली आहे. प्रभाग क्रमांक २५ मधील १६० बेड चे कोविड सेंटर चे दोन दिवसात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बडगुजर यांनी दिली.

फोटो ओळीं :

सवतानागर येथें उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरची पाहणी करतांना सुधाकर बडगुजर समवेत डॉ. मयुर पाटील व अधिकारी

Web Title: Corporation's Kovid Center at Sawtanagar