पालिकेला हवे कायमस्वरुपी आयुक्त
By Admin | Updated: July 24, 2014 00:59 IST2014-07-24T00:29:47+5:302014-07-24T00:59:50+5:30
मनसे : विभागीय आयुक्तांना निवेदन

पालिकेला हवे कायमस्वरुपी आयुक्त
नाशिकरोड : नाशिक महानगरपालिकेत कायमस्वरूपी आयुक्तांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना मनसेच्या नगरसेवकांनी दिले.
मनसेच्या नगरसेवकांनी आज दुपारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची भेट घेऊन नाशिक महानगरपालिकेत गेल्या दोन महिन्यांपासून प्रभारी आयुक्त असल्याने सर्व कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शहरात विविध समस्या निर्माण झाल्या असून, विकासकामे बंद पडली आहेत. मनपामध्ये मनसेची सत्ता असल्यामुळे आघाडी शासनाकडून जाणीवपूर्वक कायमस्वरूपी आयुक्त देण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. प्रभारी व कायमस्वरूपी आयुक्त यांच्या कामामध्ये खूप मोठा फरक पडतो. शासनाने आठ दिवसांत कायमस्वरूपी आयुक्त नियुक्त न केल्यास मनपाच्या सर्व कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा मनसेच्या नगरसेवकांनी देत निवेदन दिले.
यावेळी स्थायी समिती सभापती राहुल ढिकले, सभागृह नेता शशिकांत जाधव, मनसे गटनेता अशोक सातभाई, रमेश धोंगडे, रुची कुंभारकर, गणेश चव्हाण, डॉ. विशाल घोलप, मेघा साळवे, सुजाता डेरे, अर्चना थोरात, दीपाली कुलकर्णी, शोभना शिंदे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)