पालिकेला २५ कोटी एलबीटी५० कोटींवर

By Admin | Updated: September 22, 2015 00:17 IST2015-09-22T00:17:23+5:302015-09-22T00:17:39+5:30

उलाढाल : पाच महिन्यांत ३४२ कोटी जमा

The corporation has 25 crore LBT of 50 crore | पालिकेला २५ कोटी एलबीटी५० कोटींवर

पालिकेला २५ कोटी एलबीटी५० कोटींवर

नाशिक : महाराष्ट्र शासनाने ५० कोटी रुपयांच्या वर होणाऱ्या उलाढालीवर एलबीटी सुरूच ठेवल्याने नाशिक महापालिकेला आॅगस्ट महिन्यात एलबीटीच्या माध्यमातून सुमारे २५ कोटी रुपये प्राप्त झाले असून, एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत एकूण ३४२ कोटी रुपयांचा महसूल पालिकेच्या खजिन्यात जमा झाला आहे. दरम्यान, ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द केलेला असल्याने शासनाकडून तीन महिन्यांचे १३७ कोटी ५८ लाख रुपये अनुदान यापूर्वीच पालिकेला प्राप्त झाले आहेत.
शासनाने दि. १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांच्या वर होणाऱ्या उलाढालीवर एलबीटी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेला या उलाढालीतून किती उत्पन्न मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानुसार सुमारे ९० करपात्र व्यावसायिकांकडून महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून आॅगस्ट महिन्यात २५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. महापालिकेने ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीतून १५ ते १७ कोटी रुपये उत्पन्नच अपेक्षित धरले होते. परंतु त्यापेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त झाल्याने महापालिकेला मोठा दिलासा लाभला आहे.
आॅगस्ट २०१५ पासून राज्य शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द केला. त्यापूर्वी एप्रिल ते जुलै २०१५ या चार महिन्यांत महापालिकेने एलबीटी वसुली केली, तर आॅगस्ट महिन्यात ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीवर एलबीटी वसुली केली. त्यामुळे पाच महिन्यात निव्वळ एलबीटीपोटी महापालिकेच्या खजिन्यात ३४२ कोटी रुपये जमा झाले आहेत.
शहरात अनेक कंपन्यांची ५० कोटी रुपयांची उलाढाल ही वेगवेगळ्या शहरात असलेल्या प्रकल्पांतून झाल्याचे दाखविण्यात आले असले तरी महापालिकेने नाशिक महापालिका हद्दीत झालेल्या उलाढालीवरील कर वसूल केल्याने महापालिकेला २५ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविणे शक्य झाले आहे. मात्र, शासनाने याबाबतही संबंधित कंपन्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्यास या उत्पन्नात कपात होण्याची भीतीही पालिकेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The corporation has 25 crore LBT of 50 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.