महामंडळाला विठोबा पावला
By Admin | Updated: November 13, 2014 00:38 IST2014-11-13T00:37:50+5:302014-11-13T00:38:04+5:30
कार्तिक एकादशी : हजारो भाविकांनी केला बसमधून प्रवास

महामंडळाला विठोबा पावला
नाशिक : एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी परिवहन महामंडळाच्या वतीने सोडण्यात आलेल्या बसेसबधून सुमारे नऊ हजार भाविकांनी प्रवास करीत एकादशीची पर्वणी साधली.
आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशींसाठी बसेस सोडण्यात येतात. त्यासाठी मागील वर्षीपेक्षा सुमारे १३ जास्त बसेस सोडण्यात आल्या होत्या. मागच्या वर्षी २२, तर यंदा ३५ गाड्या वापरण्यात आल्या. त्याद्वारे २७ हजार किलोमीटर अंतरात नऊ हजार प्रवाशांची वाहतूक करीत आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. मागील वर्षी केवळ ३७०० प्रवासी आणि दोन लाख ९० हजार रुपये इतके होते.