मनपाकडे घरगुती दराने पाणी बिलाचे सॉप्टवेअरच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:17 IST2021-09-14T04:17:17+5:302021-09-14T04:17:17+5:30
नाशिक महानगरपालिका पाण्याचे नळ कनेक्शन पाणीपुरवठा विभागामार्फत दिले जातात व त्याचे बिल विभागीय अधिकरी यांचे विभागातून दिले जातात. परंतु ...

मनपाकडे घरगुती दराने पाणी बिलाचे सॉप्टवेअरच नाही
नाशिक महानगरपालिका पाण्याचे नळ कनेक्शन पाणीपुरवठा विभागामार्फत दिले जातात व त्याचे बिल विभागीय अधिकरी यांचे विभागातून दिले जातात. परंतु या नळ कनेक्शन काही नागरिक बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसल्याकारणाने ते बिगर घरगुती किंवा व्यावसायिक दराने तात्पुरत्या स्वरुपात नळ कनेक्शन घेतात व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आल्यावर विभागीय अधिकारी यांच्या विभागात घरगुती दराने बिल मागणी करतात तेव्हा या नळ कनेक्शन धारकास घरगुती दराने बिल मिळत नाही. त्यांना अनेक वेळा मनपाचे उंबरठे झिजवावे लागतात. विभागीय अधिकारी यांचे विभागातील बिल लिपिक त्या नागरिकांची पिळवणूक करतात. चुकीची माहिती देतात. त्यामुळे मनपाचे मोठे आर्थिक नुकसान होते. असे निवेदनात म्हटले आहे.
मनपाने या विषयामध्ये आपल्या सर्व्हरमध्ये दुरुस्ती करून नागरिकांना घरगुती दराने व वेळेवर घरपोच बिल द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.