शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

coronavirus: नाशिक शहरात पुन्हा कलम 144 लागू, पोलीस आयुक्तालय हद्दीत शस्त्रबंदी, जमावबंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 21:01 IST

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रार्दूभावामुळे  नागरिकांच्या  आरोग्याच्या दृष्टीने  अपायकारक परिस्थिती  निर्माण होऊ नये, या करीता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

नाशिक - शहर पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुन्हा मुबंई पोलीस अधिनियमांतर्गत शस्रबंदी, जमावबंदी तसेच कलम 144 आणि प्रतिबंधात्मक आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी लागू केले आहेत.  गुन्हे शाखेने लागू केले आहेत. सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार असून मेडिकलसारख्या वैद्यकीय सुविधांना वेळेचे निर्बंध लागू रहाणार नाही.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रार्दूभावामुळे  नागरिकांच्या  आरोग्याच्या दृष्टीने  अपायकारक परिस्थिती  निर्माण होऊ नये, या करीता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी 31 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 144 (1)(3) अन्वये आदेश लागु केले आहेत.या कालावधीच्या आदेशाची अंमलबजावणी करताना शहरात सार्वजनिक व खाजगी  आस्थापनांचे प्रमुख यांना आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी  सामाजिक अंतरासंदर्भात (सोशल डिस्टन्स) केलेल्या सुचनांचे पालन करणे बंधकारक राहणार आहे. दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फुटाचे अंतर राहील यासाठी प्रयत्नशील राहणे..कंन्टेमेंट झोन संदर्भातील शासनाने वेळोवेळी जारी केलेले आदेश वरील कालावधीत सर्व संबंधित नागरिक, व्यावसायिक वर्गाला बंधनकारक राहणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत सुरु राहतील.मात्र या कालावधीतसुद्धा ग्राहकांमध्ये सामाजिक सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकाराक आहे. दुकानाच्या परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्ती दिसून आल्यास संबंधित दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याचर आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे.मास्क सक्तीची मोहीम कठोर होणारसार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवासादरम्यान नागरीकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास, धूम्रपान, मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आठवडे बाजार, दैनंदिन बाजारासारखे  मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे सर्व सार्वजनिक उपक्रमांवर  बंदी घालण्यात आली आहे. विवाहासाठी 50 अन अंत्यविधीला 20 लोकांना परवानगीसामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम,क्रिडा स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम रद्द असून सर्व यास अपवाद म्हणून विवाहाकरीता जास्तीत जास्त 50 व्यक्ती व अंत्यविधीसाठी  जास्तीत जास्त 20 व्यक्ती यांना सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या अधिन राहून एकत्र येण्याची मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा 05 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू,पान, गुटखा, तंबाखु यांचे सेवनास प्रतिबंध आहे. 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील बालक, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांनी घरीच थांबावे केवळ अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा घेण्यासाठी त्यांना घराबाहेर जाण्याची मुभा देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समूह हे आपत्ती व्यवस्धापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड विधानाचे कलम 188 तसेच इतर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार  शिक्षेस पात्र ठरणार असल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस