शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: नाशिकमधील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 30हजारांचा टप्पा, आज 674 नव्या रुग्णांची नोंद; 7 बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 20:41 IST

शनिवारच्या तुलनेत शहरासह जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. यामुळे काही अंशी दिलासा मिळाला.  नाशिक शहरात एकूण 362 तर ग्रामीणमध्ये 246 रुग्ण आढळून आले तर  मालेगावात 65 रुग्ण मिळून आले.

नाशिक - जिल्ह्यात रविवारी (दि.22) एकूण 412 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण 674 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 30  हजार 9 इतकी झाली आहे.. दिवसभरात उपचारार्थ दाखल 7 रुग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 768वर पोहचला. मृतांमध्ये नाशिकमधील 2 तर ग्रामिण, मालेगावातील प्रत्येकी 2 आणि जिल्ह्यबाहेरील 1 रुग्णाचा समावेश आहे. या सात मयतांमध्ये दोन पुरुष असून त्या दोघांचे वय पन्नाशीच्या पुढे होते तर उर्वरित चारही महिला जेष्ठ नागरिक होत्या. शनिवारच्या तुलनेत शहरासह जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. यामुळे काही अंशी दिलासा मिळाला.  नाशिक शहरात एकूण 362 तर ग्रामीणमध्ये 246 रुग्ण आढळून आले तर  मालेगावात 65 रुग्ण मिळून आले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी मालेगावात दुपटीने रुग्ण मिळाले.  आणि जिल्ह्यबाहेरचा 1रुग्ण मिळून आला. जिल्ह्यात अद्याप 24 हजार 307 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 4 हजार 934 कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्रमणाचा धोका अधिक वाढण्याची श्यक्यता आहे. आगामी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. शहरातील बाजारपेठेत नागरिकांची विविध वस्तू खरेदीसाठी झुंबड उडत आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा होताना दिसत आहे.सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी तोंडावर मास्क लावत परस्परांत 'डिस्टन्स' बाळगणे खूप गरजेचे आहे. जिल्ह्यातील 890 अहवाल अद्याप प्रलंबित आहे. जिल्ह्यातील अद्याप एकूण 1 लाख 15 हजार 462 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवून झाले आहेत. त्यापैकी 84 हजार 563 लोक निगेटिव्ह आढळून आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक