शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : नाशिक विभागातील अभयारण्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत 'नो एन्ट्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 14:19 IST

coronavirus : शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही ठिकाणी गर्दी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक : राज्यातील करोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याने दक्षता म्हणून राखीव वनक्षेत्र व अभयारण्याचे दरवाजे पर्यटक व अभ्यासकांसाठी बंद करण्यात आले आहेत. नाशिक वन्यजीव विभागाने करोनामुळे  निफाड तालुक्यातील प्रसिध्द नांदूरमध्यमेश्वर, धुळे जिल्ह्यातील अनेर डॅम, जळगावमधील यावल, अहमदनगर मधील कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य क्षेत्रात जाता येणार नाही. या भागात सातत्याने गस्त घालण्याचे आदेश वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिले आहेत.

कळसुबाई हरिशचंद्रगड येथे पर्यटन बंदीचे आदेश 16 मार्च रोजी दिल्यानंतर  हे आदेश आता 30 एप्रिल पर्यंत लागू राहणार असल्याचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले. नाशिक परिक्षेत्रातील नाशिकसह अहमदनगर, यावल आणि धुळे वनक्षेत्रात पर्यटन बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सुटीच्या दिवशी वनक्षेत्रात पर्यटनासाठी तसेच ट्रेकिंगकरीता जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. करोनाचे सावट पर्यटनावर जाणवत असले, तरीही राखीव वनक्षेत्रात भटकंती करण्यासाठी अनेकजण येत असल्याचे निरीक्षण वनधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. यानुसार वन्यजीव विभागाने नाशिक परिक्षेत्रातील संपूर्ण वनक्षेत्रात पर्यटकांसह अभ्यासकांना जाण्यास मज्जाव केला आहे.

शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही ठिकाणी गर्दी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे वनक्षेत्रात पर्यटनास बंदी केली असून, या क्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व्यक्तिश: गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह पर्यटन बंदीकरीता विशेष पथक नेमण्यात यावे. तसेच पर्यटकांना वनक्षेत्रात न जाण्याचे आवाहन करावे. आदेशाचे उल्लंघन करुन वनक्षेत्रात जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे अंजनकरांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक