शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दुकानात काम करणाऱ्या तरुणाला कोरोनाची लागण; नाशिकमध्ये आढळला पहिला रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 22:26 IST

कोरोना विषाणु पॉझीटीव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरातील घरातील व्यक्तींचे साथरोग सर्वेक्षण  पथकामार्फत सुरु करण्यात आले आहे.

नाशिक : जिल्हयातील निफाड तालुक्यातील ३० वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण परदेशातून आलेला नसून तो एका दुकानामध्ये कामाला आहे. 

 १२ मार्चला खोकला व ताप अशी लक्षणे असल्यामुळे तो तेथील खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला होता. परंतु त्याला बरे न वाटले नाही म्हणुनतो दिनांक २५ मार्चला ग्रामीण रुग्णालय लासलगांव येथे उपचारासाठी गेला. न्युमोनियाची सदृश लक्षणे दिसत असल्यामुळे  तो स्वत:च्या वाहनाने दिनांक २७मार्चला  जिल्हा रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी दाखल झाला. त्याला जिल्हा रुग्णालय नाशिक येथील वैद्यकीय पथकाने तपासणी करून कोरोना विलगीकरण कक्षात दाखल केले. व त्याच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला असुन तो कोरोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष अहवालात आलेला आहे.

सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असुन त्याला कोरोना आजारासंबंधी येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडुन उपचार करण्यात येत आहे. उर्वरित कोरोना विलगीकरण कक्षातील दाखल आठ रुग्णांचे घश्याच्या स्रावाचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. सध्या कोरोना विलगीकरण कक्षांत ७ रुग्ण दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असुन ती सुधारत आहे.व त्यांना उद्या घरी सोडले जाणार आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संनियंत्रणानुसार कोरोना विषाणु पॉझीटीव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरातील घरातील व्यक्तींचे साथरोग सर्वेक्षण  पथकामार्फत सुरु करण्यात आले आहे. तसेच या सर्व परिस्थितीवर  विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेतील  डॉक्टर, कर्मचारी कारोना साथीच्या नियंत्रणासाठी लक्ष ठेवून आहेत. नागरीकांनी घाबरुन जावु नये, घराबाहेर पडु नये, हात वारंवार साबणाने  स्वच्छ धुवावे आपले हात नाक,तोंड,डोळे यांना लावण्याचे टाळा, असे आवाहन प्रशासनाने केले आहेत

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक