शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

Coronavirus: हा जन्म ना पुरेसा, होऊ कसा उतराई…; नाशकातल्या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 7:16 PM

कुठून सुरुवात करू, आभार मानू की सदैव या यंत्रणेच्या ऋणात राहू, हेच कळत नाही.

नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रुग्ण काल आजारातून बाहेर पडला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले; त्यावेळी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे त्याच्याशी बातचीत करण्यात आली आहे. ‘कुठून सुरुवात करू, आभार मानू की सदैव या यंत्रणेच्या ऋणात राहू, हेच कळत नाही. खरं सांगायचं झालं तर मी आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आरोग्य सेविका या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. कारण यांनी माझ्यासाठी दिलेली सेवा ही कशातही मोजता येणार नाही. माझ्यासाठी व माझ्या कुटुंबांसाठी ते रिअल हिरो ठरले आहेत. मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या देवदूतांना मी एवढेचं म्हणेन…‘सांग आरोग्यदूता उपकार कसे मी फेडू…हा जन्म ना पुरेसा…उतराई कसा होऊ…’, अशा भावना नाशकातल्या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णानं व्यक्त केल्या आहेत. सोमवारी २० एप्रिल रोजी हा रुग्ण बरा होऊन आपल्या घरी निघाला, तेव्हा त्याच्याशी संवाद साधण्यात आला. तुम्हाला कोरोनाची लागण कुठे आणि कधी झाली असावी, असे तुम्हाला वाटते?व्यवसायानिमित्त मी २२ मार्चला दिल्ली येथे गेलो येतो. त्यावेळी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर मी साधारण २ तास थांबलो होतो. कदाचित तेथूनच मला कोरोनाची लागण झाली असावी, असा माझा अंदाज आहे. ४ एप्रिल रोजी पोलीस माझ्या घरी आले. त्यांनी मला सांगितले की, तुमच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीनुसार तुम्ही दिल्ली परतीचा प्रवास केला आहे. त्यामुळे तुम्हाला रुग्णालयात तपासणीसाठी यावे लागेल. त्यानंतर सारे तुम्हाला माहीतच आहे. माझ्या स्वॅबचा रिपोर्ट ६ तारखेला आला आणि मला कोरोना झाल्याचे समोर आलं. तेथून पुढे माझ्यावर जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाले. एक आमचं सुदैव, की माझ्या घरातील कोणालाच कोरोनाची लागण झालेली नव्हती. त्या सगळ्यांचे रिपोर्टदेखील निगेटिव्ह आले.नाशिक सिव्हिलमध्ये उपचार घेत असतानाच्या अनुभवाबद्दल काय सांगाल?सरकारी दवाखाना म्हटला की, आपली नकारात्मक मानसिकता असते. मात्र नाशिक जिल्हा रुग्णालय या बाबतीत खूप वेगळे आहे. येथे उपचार घेत असतानाचे अनुभव अतिशय विलक्षण होते. एवढ्या आणीबाणीच्या प्रसंगी देखील आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता कुठलेही ऋणानुबंध नसताना अगदी आपल्या माणसांसारखीच सेवा देत होते. मी आणि माझ्यासह इतरही रुग्ण बरे व्हावेत म्हणून स्वत:च्या प्राणांची बाजी लावणारे डॉक्टर यांच्या श्रमाला शब्दात मांडता येणार नाही. परमेश्वरापेक्षा ते माझ्यासाठी कमी नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. अनंत पवार, डॉ. प्रमोद गुंजाळ व डॉ. चेवले यांचे खास करून आभार मानावेसे वाटतात. त्यांनी माझ्यावर योग्यवेळी योग्य उपचार केले.या काळात कुटुंबाने कशी साथ दिली?माझ्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब क्वारंटाइन झाले होते. संपर्कात तर नव्हतोच. पण तरीही सर्वांच्या मनात एक अनामिक भीती होती. कारण कोरोनाने संपूर्ण कुटुंबच वेठीस धरले होते. परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबीयांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले व जीव भांड्यात पडला. मात्र असे असतानाही माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर माझा परिवार मुळीच खचला नाही. ते सगळे माझ्याशी अधूनमधून बोलत होते. धीर देत होते. नाशिक सिव्हिल हॉस्पिटलचा परिवार आणि माझा परिवार हेच या काळात माझ्या पाठीशी होते.यापुढे कोरोनाशी कसा लढा देणार, काय काळजी घेणार?डॉक्टरांनी दिलेले सर्व पथ्य पाळणार आहे. त्यांनी सांगितलेला डायट कायम ठेवणार आहे. कोरोना असो अथवा नसो स्वत:ची आणि समाजाची काळजी घेणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम असो अथवा मास्कचा वापर आदींबाबत मी दक्ष असणार आणि समाजालाही सांगणार आहे. कोरोनाबाबत, त्याच्या उपचारपद्धतीबाबत आणि एकूणच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या यंत्रणेबाबत मी यापुढे जनजागृती करणार आहे.समाजाला काय संदेश देणारसमाजाला मी एवढेच सांगेन की, माझा आणि माझ्या आनंदाचे श्रेय संपूर्ण आरोग्य यंत्रणेला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले, तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. परंतु येथील आरोग्य यंत्रणेने माझ्यावर उपचार करण्याबरोबरच मला मानसिकरीत्या देखील सक्षम केले. त्यामुळेच मी आज कोरोनासारखे युद्ध जिंकू शकलो आहे. देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी डॉक्टरांचे ऐकावे व पोलिसांना सहकार्य करावे. घरात राहा जीवनावश्यक गोष्टींपेक्षा जीवन खूप महत्त्वाचे आहे. कारण तुमच्या एका निष्काळजीपणामुळे तुम्ही अनेकांना धोका पोहोचवू शकतात. घरात राहा, सुरक्षित राहा.(शब्दांकन : मोहिनी राणे-देसले, माहिती अधिकारी, नाशिक)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याNashikनाशिक