शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : मुदतबाह्य मिठाईची विक्री कराल तर खबरदार, एफडीएचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 13:47 IST

मुदतबाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद्भवू शकतात.सबब सदर विक्री बंद कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवणासाठी वाटप करण्यात येऊ नये.

नाशिक : करोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर योग्य त्या उपाय योजना आखण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून दि 22/3/2020 रोजी जनता कर्फ्यु व आज दि 24/3/2020 पासून संचार बंदी लागू करण्यात आली आहे, तसेच अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तु जसे ,दूध, किराणा ,भाजीपाला या व्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यातआले आहेत. मिठाई पदार्थ हे अत्यावश्यक व्यापारात मोडत नाहीत. त्यामुळे हा व्यवसायही  बंद आहे. अशा मिठाई उत्पादक व व्यापाऱ्यांकडे काही प्रमाणात मिठाई शिल्लक असू शकते. व्यापाऱ्यांकडून मिठाईची  सर्वोत्तम दिनांकाची मुदत  संमपल्यानंतर  विक्री होऊ शकते. बहुतेक मिठाई प्रामुख्याने दूध  व दुग्धजन्य पदार्थ यासारख्या नाशवंत पदार्थापासून तयार करण्यात येते. मुदतबाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद्भवू शकतात.सबब सदर विक्री बंद कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवणासाठी वाटप करण्यात येऊ नये.सध्याच्या जागतिक आपत्तीच्या परिस्थितीत पुन्हा कोणतीहि आपत्तीजनक परिस्थिती उद्भवेल अशी कृती कोणीही करू नये. असे करतांना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,  याची नोंद घ्यावी. कृपया सर्व मिठाई उत्पादक व विक्रेत्यांना पोहचेल अशा प्रकारे याचा प्रसार करण्यात यावा.उद्या सर्वत्र गुडी पाडवा साजरा केला जात आहे.जनतेने बाहेरील मिठाई ऐवजी घरी तयार केलेली मिठाईचं सेवन करावी. - चंद्रशेखर साळुंके, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgudhi padwaगुढीपाडवाNashikनाशिकFDAएफडीए